माणसाला किती वस्तू लागतात ?

हा प्रश्न अनेक वर्षे पडत होता. पण याचं समाधानकारक उत्तर सापडत नव्हतं.मधल्या काळात याविषयावर काही फिल्म्स पाहिल्या, वाचन झालं.त्यावेळी Minimalism ही concept कळली. आपले कोकणातले पूर्वज (किंवा अगदी आजही) जसे राहात होते किंवा राहतायत त्याला हा एक इंग्लिश शब्द मिळाला ! 🙂 कोकणातल्या लोकांना त्याची ‘थिअरी’ करता आली नाही. ‘एक दांडीवर, एक Xडीवर’ असं चारचौघात…… Continue reading माणसाला किती वस्तू लागतात ?

शांततेचा आवाज…… बिखरने का मुझको शौक हे बड़ा….!

या गाण्याची आणि माझी ओळख झाली इन्स्टाग्रामच्या रील्समधून. तुम्हाला माहित्ये, रील्समध्ये फक्त सुरुवातीची काही सेकंदच ऐकू येतात आणि तुम्ही पुढे सरकला नाहीत तर पुन्हा पुन्हा तेच ऐकू येत राहतं. त्या वीस सेकंदांच्या गाण्याची आणि शब्दांची इतकी ताकद की त्या रीलने मला चार मिनिटं सतरा सेकंदाच्या गाण्याकडे खेचून नेलं. आणि मग काय ! प्रेमातच पडलो गाण्याच्या.…… Continue reading शांततेचा आवाज…… बिखरने का मुझको शौक हे बड़ा….!

१३ ऑक्टोबर: दोन आठवणी

१३ ऑक्टोबर १९८७ मी पाचवीत वगैरे असेन बहुदा. नोव्हेंबरमध्ये आमच्या गिरगावातल्या वाडीत आम्हा हौशी कलाकारांचं एक नाटक होणार होतं. त्याची संध्याकाळी रिहर्सल सुरू असताना आमचा डायरेक्टर निलेश केळकर आला आणि म्हणाला, ‘आज पुढची रिहर्सल होणार नाही. किशोर कुमार गेला.’ कोणी एक गायक गेला तर त्यात आपल्या नाटकाची रिहर्सल कॅन्सल करण्यासारखं काय इतकं?’ असा एक भाव…… Continue reading १३ ऑक्टोबर: दोन आठवणी

Actually…I met them: गुलज़ार यांच्या पुस्तकाच्या निमित्ताने

आठवणी या जखमेसारख्या असतात असं म्हणतात. एकदा खपली निघाली की जखम वाहायची थांबत नाही. पण गुलज़ार आठवणी सांगतात तेव्हा त्या जखमाही सुगंधी होतात ! पेंग्विन पब्लिशर्सने आणलेले Actually… I met them हे पुस्तक गुलज़ार साहेबांच्या अशाच सुगंधी आठवणींचा खजिना आहे. एक गोष्ट आधीच स्पष्ट करायला हवी. हे पुस्तक गुलज़ार यांनी स्वतः लिहिलेले नाही. गुलज़ार साहेबांनी…… Continue reading Actually…I met them: गुलज़ार यांच्या पुस्तकाच्या निमित्ताने

C/o Kancharapalem: फिल्मी Love Stories च्या पलीकडलं काही !

ही तेलगू फिल्म २०१८ मधली आहे. पण ती २११८ मध्ये पाहिली तरी तितकीच ताजी वाटेल. याचं कारण वरकरणी साध्या वाटणाऱ्या त्या गोष्टीतला अस्सलपणा. वयाच्या विविध टप्प्यावर घडणाऱ्या या चार प्रेमकथा आहेत. सिनेमा घडतो तो आंध्र प्रदेशातील कांचरपालेम नावाच्या एका छोट्या गावात. यातली एकही प्रेमकथा गोड गुलाबी नाही. या प्रत्येक प्रेमकथेत odds जास्त आहेत. वय, कुटुंब,…… Continue reading C/o Kancharapalem: फिल्मी Love Stories च्या पलीकडलं काही !

अवचट

परवा २७ तारखेला सकाळी सकाळी अनिल अवचट गेल्याची बातमी आली. ते आजारी असल्याचं माहीत होतं. पण तरीही बातमी वाचून आत काहीतरी हललं.  पुढची कामं लागली होती. एखाद्या खोलीत चित्र- विचित्र रंगांच्या गोष्टी असल्या तरी त्या खोलीला स्वतःचा म्हणून एक रंग असतो. त्याप्रमाणे कामं करत असतानाही बॅकग्राऊंड मध्ये अवचट आठवत राहिले. निसर्गाच्या नियमाप्रमाणे, आलेला माणूस कधीतरी…… Continue reading अवचट

सलून

सलून आणि स्मशान या दोन वास्तूंचा मला कायम हेवा वाटत आलाय. इतक्या अपरिहार्य आणि रिसेशन-प्रूफ जागा जगात नसतील. पहिल्या जागेत आपणच consumer आणि customer या नात्याने वारंवार जात असतो. दुसऱ्या जागेत आपण consumer म्हणून एकदाच जातो आणि त्यावेळी customers मात्र आपले सगे सोयरे असतात. मी केस कापून येतो, असं चुकीचं मराठी बोलत आपण पुरुष घराबाहेर…… Continue reading सलून

दारू म्हणजे काय ?

काही गोष्टी विकत घ्यायला मी आणि बायको बाहेर पडलो होतो. एका दुकानात बायको काहीतरी विकत घ्यायला आत गेली. मी म्हटलं तुझं आटपलं की हाक मार, मी बाहेरच थांबतो. त्या दुकानाच्या बाजूला दारूचं चकचकीत दुकान होतं. रविवार सकाळ. रिपरिप पाऊस. एकही क्षण काऊंटर मागचा सेल्समन रिकामा नव्हता. सतत माणसं येत होती. माणसं काहीतरी पुटपुटल्यासारखं करत आणि…… Continue reading दारू म्हणजे काय ?

आईना मुझसे मेरी पहली सी सूरत मांगे !

स्वातंत्र्योत्तर मुंबईच्या निर्मितीचा मला तुम्ही एक असा रस्ता, एक अशी इमारत किंवा या शहराचा एक असा तुकडा दाखवा जो पाहिल्यावर तोंडून सहजपणे ‘व्वा’ उच्चारला जाईल ! खड्डे पडलेले रस्ते, सौन्दर्य वगैरे कसलाही विचार न करता फक्त ‘माहिती’ म्हणून लावलेल्या दुकानावरच्या पाट्या, इकडून तिकडून लटकणाऱ्या केबल आणि विजेच्या बेशिस्त वायरी, झाडांचा मागमूसही नसलेला नुसता लांबलचक सिमेंट…… Continue reading आईना मुझसे मेरी पहली सी सूरत मांगे !