राह पे रहते है…

आज सुमारे तीन महिन्यांनी song of the day लिहायला घेतोय. काहीतरी सुचणं, ते लिहावंसं वाटणं आणि ते प्रत्यक्षात लिहून स्वतःमधून बाहेर उतरवणं या तिन्ही गोष्टी भिन्न असतात. त्यांचा दरवेळी एकमेकांशी संबंध असतोच असं नाही. या तिन्ही गोष्टी गेल्या तीन महिन्यात वेगवेगळ्या वेळी भेटल्या. त्यामुळे लिहायचं राहून गेलं. ते ‘घडावं’ यासाठी ‘प्रयत्न’ केलात की विषय संपलाच…… Continue reading राह पे रहते है…

भय इथले संपत नाही

मी नववीत असताना आयुष्यात ‘ग्रेस’ आले, हे मला चांगलं आठवतंय. ‘ती गेली तेव्हा रिमझिम’ कोणी लिहिलंय म्हणून कॅसेटच्या आत पाहिलं तर ‘ग्रेस’ असं नाव दिसलं. ‘ग्रेस’ या आगळ्या नावानेच भुरळ पाडली. ‘ऐकायला तर छान वाटतंय, पण काही कळत नाहीये’ अशा एका विचित्र मनस्थितीत त्या रहस्यमय गुहेत जात राहिलो. कॉलेजमध्ये असताना खाजगी मैफिलींमध्ये ‘तुला पाहिले मी…… Continue reading भय इथले संपत नाही

… साँझ की दुल्हन !

गाण्याच्या पहिल्याच म्युझिक पीसला कळतं की आता काहीतरी mystical असं ऐकायचंय…आपल्यासमोर कुठलसं रहस्य उलगडत जाणार आहे. मग मागोमाग, घरी परत जाणाऱ्या गाई-बैलांच्या गळ्यातील घुंगरू ऐकू येतात. संगीत ‘फेड आउट’ होत जातं..मग घरट्यात परतणाऱ्या पाखरांचा चिवचिवाट… अवघ्या तेवीस सेकंदात सलील चौधरी नावाचा जादूगार आपल्यासमोर एक अद्भुत ‘संध्याकाळ’ उभी करतो ! आणि गिटारच्या सुरांचं बोट धरून मुकेशचे…… Continue reading … साँझ की दुल्हन !

दिलबरो..

‘राझी’ सिनेमा अनेक कारणांनी गाजला. भारत-पाकिस्तान सारखा ज्वलंत विषय, विषयाची हाताळणी, आलिया भटचा अभिनय, मेघना गुलजारचे लक्षणीय कमबॅक, विकी कौशल…या सगळ्याच छान-छान गोष्टींच्या गर्दीत ‘दिलबरो’ हे तितकंच छान गाणं हरवून जातं. म्हणूनच आज खास त्या गाण्याला तुम्हा सर्वांसमोर पेश करावसं वाटतंय. आपल्या देशातच नव्हे तर सगळ्या जगात मुलीने लग्न होऊन सासरी जाणे या एका घटनेत…… Continue reading दिलबरो..

फोडणीची पोळी

फोडणीची पोळी’ या पदार्थाला भारताचे ‘राष्ट्रीय खाद्य’ म्हणून राजमान्यता मिळायला हवी, असे माझे आग्रही मत आहे. त्याची अनेक कारणे आहेत. ‘चव’ हे तर मुख्य कारण आहेच. पण त्याहीपेक्षा ‘जुगाड’ या आपल्या महान परंपरेचे इतके चविष्ट प्रतिनिधित्व करणारा हा पदार्थ जगात कुठेही (चवीलाही) सापडणार नाही याची मला खात्री आहे. म्हणूनच इतक्या ‘युनिक’ पदार्थाला या देशाचा राष्ट्रीय…… Continue reading फोडणीची पोळी

दिव्य दृष्टी !

भावेश भाटीया’ हे नाव फक्त वाचले होते. ऐकले होते. काही दिवसांपूर्वी आम्ही सहकुटुंब काही मित्रमंडळी खास त्यांना भेटायला महाबळेश्वर येथे त्यांच्या निवासस्थानी गेलो. ‘गुगल मॅप’वर त्यांचा पत्ता शोधत निघालो. ‘You have arrived’ असं गुगलने सांगेपर्यंत एका बसक्या घराच्या गेटवर सव्वा सहा फुट उंचीचे भारदस्त भावेश भाटीया आमच्या स्वागतासाठी उभे होते. अतिशय उत्साहात त्यांनी आमचे स्वागत…… Continue reading दिव्य दृष्टी !

गणेशोत्सव..सोशल मीडियाच्या पलीकडचा !

ब्राऊन रंगाची ताडपत्री घातलेला एक मोठ्ठा मांडव. उद्या गणपती यायचाय म्हटल्यावर मांडवात एक अमूर्त चैतन्य ओसंडून वाहतंय. आम्हा लहान मुलांना मोठ्या लोकांनी कामं वाटून दिली आहेत. रात्रीचे बारा वाजून गेले आहेत. आमची गिरगावातील वाडीच्या वाडी आत्ता खाली उतरली आहे. जणू रात्रीचे नाहीत, दुपारचे बारा वाजलेत असं वातावरण ! कोणी मांडव झाडतोय. कोणी फुलांच्या माळा करतोय.…… Continue reading गणेशोत्सव..सोशल मीडियाच्या पलीकडचा !

मृत्युंजय

डॉ वसुधा आपटे या साध्यासुध्या डॉक्टर नाहीत. त्यांच्याखेरीज न्यायवैद्यक शास्त्र (forensic medicine) या पुरुषप्रधान क्षेत्रात गेली ४५ वर्षे सातत्याने कार्यरत असलेली उभ्या महाराष्ट्रात दुसरी स्त्री नाही ! संपूर्ण भारतात या क्षेत्रात आजच्या घडीला केवळ १४-१५ स्त्रियाच कार्यरत आहेत. डॉ आपटे यांनी जेव्हा या कार्यक्षेत्रात पदार्पण केलं तेव्हा आणि त्यानंतरही पुढची अनेक वर्षे शवविच्छेदन (Post mortem)…… Continue reading मृत्युंजय

कल्पनेहून उंच अशी एक दहीहंडी !

आज गोपाळकाला. सकाळीच माझा मुलगा म्हणाला, बाबा दहीहंडी बघायला जाऊया. हल्ली गर्दी नको वाटते. चार लोकांच्या गप्पांच्या मैफिलीत गप्पांची आवड नसलेला कुणी पाचवा आला तरी जिथे गर्दी वाटते अशात गोविंदाची गर्दी म्हणजे टू मच ! मी आधी नको म्हटलं. मग म्हटलं तू जाऊन ये मित्रांसोबत. पण मुलगा मीच यावं असा फारच हट्ट करू लागला. मनात…… Continue reading कल्पनेहून उंच अशी एक दहीहंडी !

अजिंठा लेणी – डिजिटल !

‘प्रसाद पवारला भेटलायस का कधी?’ नाशिकमधल्या आमच्या सुनील खांडबहालेने विचारलं. मी मानेने नाही म्हटलं. ‘भेट एकदा. भारी काम आहे.’ मी जितक्यांदा प्रसाद पवारला भेटतो, तेव्हा मला सुनीलचे ते शब्द हटकून आठवतात. भारी काम ! या देशातल्या अनाम कलाकारांनी हजारो वर्षांपूर्वी निर्माण करून ठेवलेलं ‘अजिंठा’ हे एक स्वप्नशिल्प ! ते कलावैभव, तो वारसा, तो इतिहास हे…… Continue reading अजिंठा लेणी – डिजिटल !