करोनोपनिषद # ७ – सेलिब्रिटी ! (भाग २)

मी पंडित हरिप्रसाद चौरसियांना ओळखत असलो, तरी ते मला ओळखत नाहीत. पण हरिजी आणि माझे one to one म्हणता येतील असे दोनच पण खूप गोड प्रसंग आहेत. मी आणि (अर्थातच) माझी पत्नी विमानाने हनीमुनला जात होतो. आम्ही एअरपोर्ट बसमध्ये शिरलो आणि समोर एक रिकामी सीट दिसली. मी तिथे बसायला जाणार तितक्यात एक व्यक्ती त्या सीटवर…… Continue reading करोनोपनिषद # ७ – सेलिब्रिटी ! (भाग २)

करोनोपनिषद # ७ – सेलिब्रिटी !

आत्ताच्या लॉकडाऊनमध्ये परवा whatsapp वर एक सुंदर व्यंगचित्र आलं होतं. पाऊस पडतोय. बुद्धिबळाचा पट छतासारखा दुमडून त्याखाली सगळे राजा, वझीर, घोडे, उंट, हत्ती उभे आहेत, आणि सगळी प्यादी पावसात भिजत बाहेर उभी आहेत. हे पाहिलं आणि याच काळात दुसरीकडे वाचलेलं एक वाक्य आठवलं – लॉकडाऊनने आपल्याला हेही शिकवलं की आयुष्यात खरे हिरो वेगळे असतात. आपण…… Continue reading करोनोपनिषद # ७ – सेलिब्रिटी !

करोनोपनिषद # ६

एक हृद्य आठवण केसरीभाऊंची !      लॉकडाऊन झाल्यावर सुरुवातीला वाटलं होतं की हाताला काहीतरी ऍक्टिव्हिटी हवी, नाहीतर दिवस खायला उठेल.  त्यामुळे अनेक गोष्टी उकरून काढल्या. कपाटं आवरली. वस्तू कमी केल्या. हार्ड डिस्कवर कित्येक वर्षे ‘गुमनाम’ अवस्थेत  पडून असलेले जुने फोटो पाहिले. पुस्तकं वाचली. बघायचे राहून गेले होते ते सिनेमे पाहिले. पत्त्यांचे जुने खेळ खेळून झाले.  चिक्कार…… Continue reading करोनोपनिषद # ६

करोनोपनिषद # ५

Song of The Day ! नूर ए ख़ुदा… काल खूप दिवसांनी आवडत्या गाण्यांची playlist उघडली. नेटफ्लिक्स, प्राईम, हॉटस्टार वगैरे मनोसोक्त पाहून थकलेल्या डोळ्यांना आता विश्रांती हवी होती. आपल्या आवडत्या गाण्यांची एक गोची असते. आपण ती इतक्या वेळा ऐकलेली असतात, की काही दिवसांनी ती आपण ‘ऐकतच’ नाही कारण आपल्या शरीराचा ती भाग होऊन जातात. ‘उभा तुझ्या…… Continue reading करोनोपनिषद # ५

करोनोपनिषद # ४

दूरदर्शनवर रामायण, महाभारत सुरू होतंय कळल्यावर या देशात असा काही आनंद आणि उत्साह संचारला की विचारू नका ! रामायण व महाभारत मालिकांमधील (त्या काळात) रस्ते ओस पाडायची शक्ती आत्ता लोकांना घरी बसवण्यात उपयोगी पडेल, असं बहुदा सरकारला वाटलं असावं. मनोरंजनाच्या बाबतीत म्हणाल तर आताचा काळ कायच्या काय पुढे गेलाय. आता तुम्ही उत्साहाने रामायण महाभारत बघायला…… Continue reading करोनोपनिषद # ४